लांज्यातील दोन लहानग्यांना करोना; रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७

आज (ता. ११ मे) सायंकाळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांमध्ये पाच जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४७ झाली आहे. आज निश्चिती झालेल्या रुग्णांमध्ये लांजा तालुक्यातील नऊ आणि १० वर्षांच्या दोघा लहानग्यांचा समावेश आहे. लांजा तालुकाही आता करोनाबाधित तालुक्यांच्या यादीत आल्याने, रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी आता केवळ राजापूर तालुका करोनामुक्त राहिला आहे.

रत्नागिरीत करोनाचा दुसरा बळी; दापोलीतील महिलेचा मृत्यू

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील एका करोनाबाधित महिलेचा आज (१० मे) रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोना बळींची संख्या दोन झाली आहे. रत्नागिरीतील करोनाबाधितांची आजपर्यंतची संख्या ४२ असून, त्यापैकी पाच जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरीच्या करोना रुग्णांची संख्या ४२वर; आज नवे ८ रुग्ण सापडले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजही (१० मे) आठ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ४२वर गेली

माझी मुंबई चाकरमान्यांना सांभाळू शकत नाही?

साप्ताहिक कोकण मीडियाच्या आठ मे २०२०च्या अंकाचे संपादकीय…

रत्नागिरीतून आठ मेपासून एसटी सुरू; परवानगी मिळालेल्यांनाच प्रवास करता येणार

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमध्ये सवलत दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार उद्या (दि. ८ मे) राज्यातील मुंबई आणि पुणे वगळता इतर आठ जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी २५ एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत.

रत्नागिरीत आढळले दोन नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीत काल रात्री (ता. १ मे) दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली.