शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०१८ रोजी वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षांत रुग्णालय पूर्ण होऊन रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आणि त्याचे उद्घाटन आता मुख्यमंत्री झालेले तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने रुग्णालयातील सोयीसुविधांचा आढावा.
