रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे केंद्र सरकारच्या पातळीवरून केली जातील, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी सात डिसेंबर रोजी रत्नागिरीत दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे केंद्र सरकारच्या पातळीवरून केली जातील, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी सात डिसेंबर रोजी रत्नागिरीत दिली.
सिंधुदुर्गातील जनशिक्षण संस्थान आणि पुणे विमान प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील एक हजार महिलांना शिलाई मशीन आणि सायकल बँकअंतर्गत शंभर शाळांमधील एक हजार मुलींना सायकलचे वितरण या वेळी करण्यात आले.
रत्नागिरी : राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसाऩभरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून करोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (३० नोव्हेंबर) रत्नागिरीत केली.
रत्नागिरी : लॉकडाउन काळातील वाढीव वीजबिले माफ करण्याच्या मागणीसाठी आज (२३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर वीजबिले फाडून आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात महावितरणकडून देण्यात आलेल्या अवास्तव वाढीव वीजबिलांविरोधात २३ नोव्हेंबर रोजी भाजपच्या दक्षिण रत्नागिरी विभागातर्फे चार तालुक्यांमध्ये आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजव्यापी आंदोलन केले जाणार आहे. त्या आंदोलनाचाच हा एक भाग आहे.
रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपने नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला. ‘रस्त्यावरील खड्डे भरा, नाही तर खुर्च्या खाली करा, आठ दिवसांत सर्व रस्ते चकाचक करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू,’ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिला.