पत्रकारांना हाकलण्याचा उद्दामपणा

आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पत्रकार रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची शक्यता नाही आणि त्यांनी तसे ते केले तरी ते केवळ प्रतीकात्मक असेल. नेत्यांप्रमाणे त्यांच्या पाठीशी लोकांचा जमाव नसतो. पण तरीही लोकमत जागवण्याचे, नवी मते निर्माण करण्याचे काम माध्यमेच करू शकतात. दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकमत तयार करण्याचे कामही ही माध्यमे करू शकतात, याची जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी. लोकप्रतिनिधी संभ्रम निर्माण करतात, माध्यमे समन्वय निर्माण करू शकतात. त्यांच्याशी प्रशासनाने समन्वयानेच वागायला हवे. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मुळावर येऊ शकतो.

दिशा मिळाली, लक्ष्य कोठे?

शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.

बंडखोर की तारणहार?

शिवसेनेतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपली घुसमट व्यक्त केली. पण मुख्यमंत्री असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी पक्षानिष्ठेपेक्षाही पदच प्रतिष्ठेचे केले. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या तत्त्वांशीच अडीच वर्षांपूर्वी बंडखोरी केली. त्याची निस्तरणीच शिंदे आता करत आहेत.

कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहोचवू या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश आपल्या कामातून देऊ या,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३० जून २०२२) केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी बैठकीस उपस्थित होते.

हाती केवळ एक शून्य!

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कवी विंदा करंदीकर यांची ‘तेच ते आणि तेच ते’ ही कविता नेहमीच आठवते. रोज नवे काही घडत असल्याचे भासत असले तरी त्यात फारसे काही वेगळे नसते. राजकारण्यांच्या खेळामध्ये पाच वर्षांनी एकदाच खेळल्यानंतर फेकून देण्याच्या लायकीची प्यादी म्हणूनच आपला उपयोग झाला आहे, हे आपल्याला समजत असते. खेळ त्यांचा होतो. आपला जीव जातो. ते पाहायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा स्थितीत आपण काहीही करू शकत नाही. विंदा करंदीकरांची कविता आपण जगत असतो.

सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद जगवला पाहिजे : डॉ. अशोकराव मोडक

रत्नागिरी : कम्युनिस्ट, डाव्यांच्या रशियाला अजूनही युक्रेनवर निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही देशांचे मूळ एकच आहे. परंतु परकीय निष्ठा सांगणाऱ्या कम्युनिस्ट राष्ट्रवादाचा पराभव होत आहे. त्याच वेळी वीर सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद आजच्या काळात महत्त्वाचा आहे. तो आपण साऱ्यांनी जगवला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी लिहिलेल्या ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यावर ते बोलत होते.