चिपळूण : शेतीतून महिलांना आर्थिक समृद्धीचा राजमार्ग दाखविणाऱ्या दिशान्तर संस्थेतर्फे ३ लाख ३० हजार रुपयांच्या श्रमसन्मानाचे वितरण करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : शेतीतून महिलांना आर्थिक समृद्धीचा राजमार्ग दाखविणाऱ्या दिशान्तर संस्थेतर्फे ३ लाख ३० हजार रुपयांच्या श्रमसन्मानाचे वितरण करण्यात आले.
चिपळूण येथील एक मर्चंट नेव्ही अधिकारी अस्लम मालगुंडकर स्वतःच्या नोकरीवर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून करोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ७० करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या जेवणखाण्याची स्वतःच्या घरातून व्यवस्था करून परत सुखरूप घरी सोडण्याचे काम या अधिकाऱ्याने करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
चिपळूण : कोकणातील विपरीत परिस्थितीशी झुंजणाऱ्या अतिदुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिशान्तर संस्थेने चार वर्षांत २१ लाखांहून अधिक रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली आहे.
चिपळूण : करोनाच्या प्रादुर्भावामुळे जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी चिपळूण येथे येत्या बुधवारी (दि. १४ एप्रिल) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
चिपळूण : अन्नपूर्णा प्रकल्प म्हणजे आनंद नि समृद्धीच होय. शेतीतून श्रमसंस्कार, सामाजिक प्रतिष्ठा, अर्थक्रांती घडविणारा ठरला हा प्रकल्प आहे, असे गौरवोद्गार लोटे (ता. चिपळूण) येथील कन्साई-नेरोलॅक पेन्ट्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढले. सविस्तर बातमी सोबतच्या लिंकवर –
राष्ट्रीय महामार्ग विभागाने सूचित केल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल तसेच संगमेश्वरजवळील शास्त्री पूल या पुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्याकरिता या दोन्ही पुलांवरील वाहतूक १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहे.