चिपळूणला बुधवारी रक्तदान शिबिर

चिपळूण : करोनाच्या प्रादुर्भावामुळे जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी चिपळूण येथे येत्या बुधवारी (दि. १४ एप्रिल) बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिज्ञासा उत्तर रत्नागिरी, अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची चिपळूण शाखा यांनी संयुक्तपणे या शिबिराचे आयोजन केले आहे.

१८ वर्षे ते ५५ वर्षे वयोगटातील इच्छुकांना रक्तदान करता येईल. रक्तदात्याचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असावे. रक्तदान करण्याच्या आदल्या दिवशी पूर्ण झोप झालेली असावी. जागरण करू नये. अॅस्पिरिन, पॅरासिटामॉल आणि इतर कोणत्याही प्रकारची औषधे घेतलेली नसावीत. रक्तदानाला येताना सकाळी पुरेसा आहार घेऊन यावे. रक्तदानाच्या दिवशी वा आधी ताप नसावा.

बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर एसटी बसस्थानकासमोर विवेकानंद हॉलमध्ये होईल. रक्तदानाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी गुगलवरून आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता https://forms.gle/Q9pkiNAZgMVZCGqG6 या लिंकवर जाऊन अर्ज भरावा.

अधिक माहितीसाठी दर्शन (8108599457) किंवा अस्मिता (8268747072) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply