रत्नागिरी जिल्ह्यात २४८ नवे करोनाबाधित, दोघांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची वाढ सुरूच आहे. आज (१० एप्रिल) नवे २४८ रुग्ण आढळले, तर १३४ रुग्ण करोनामुक्त झाले. दोघांचा मृत्यू झाला. आजही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. सर्वाधिक ७५ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ६३, खेड १५, गुहागर २३, चिपळूण २६, संगमेश्वर ४४, मंडणगड ६, लांजा ११, राजापूर ६ (एकूण १९४). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १२, दापोली १५, खेड ६, गुहागर ८, चिपळूण ६, संगमेश्वर २, मंडणगड ४ आणि राजापूर १. (एकूण ५४) (दोन्ही मिळून २४८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार ५१९ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८६६ आहे. त्यातील सर्वाधिक १४८ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ३७० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १३४ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार ८८४ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आजही पुन्हा कमी झाला असून तो ८६.९३ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ७९५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख पाच हजार ८४४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात दोघा पुरुष रुग्णांची नोंद आज झाली. त्यापैकी एकाचा खासगी रुग्णालयात, दुसऱ्याचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील ६९ वर्षीय रुग्णाचा आज, तर मंडणगड तालुक्यातील ८२ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू काल झाला. दोन्ही मृत्यू आज नोंदविले गेले. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३९१ असून मृत्युदर ३.१२ टक्के झाला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply