सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१० एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे १४१ रुग्ण आढळले, तर ४९ जण करोनामुक्त झाले. आज तिघांचा मृत्यू नोंदविला गेला.
आजच्या १४१ रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ७ हजार ९८७ झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७१८, दोडामार्ग – ४०८, कणकवली – २२९९, कुडाळ – १७१२, मालवण – ७९३, सावंतवाडी – १०४९, वैभववाडी – ३०५, वेंगुर्ले ६५६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ४७.
आज ४९ जण करोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या ६ हजार ७८२ झाली आहे.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती एक हजार ३ झाली आहे. सर्वाधिक १८९ सक्रिय रुग्ण देवगड तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – दोडामार्ग ३४, कणकवली १८६, कुडाळ १७९, मालवण १२९, सावंतवाडी १११, वैभववाडी ८४, वेंगुर्ले ७६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १५.
आज तिघांत्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – वायरी (ता. मालवण) येथील ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.
नाधवडे (ता. वैभववाडी) येथील ६०वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला. त्याला दमा, उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचा आजार होता.
नानिवडे (वैभववाडी) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १९६ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
ई-संजीवनी कार्यक्रम
जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचारांवर सल्लामसलत करण्यात यावी, यासाठी ई-संजीवनी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा आतापर्यंत ९५ जणांनी लाभ घेतला आहे. नागरिकांनी ई-संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media

