वाढीव वीजबिलासंबंधी ३० जूनला रत्नागिरीत विशेष ग्राहक मेळावा

मार्च, एप्रिल व मे या लॉकडाउन कालावधीमध्ये ग्राहकांचे मीटर रीडिंग झाले नसल्यामुळे जून महिन्यात वीजबिले जास्त आली आहेत. वीजबिलांसंबंधी वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारी पाहता उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (३० जून) रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाउन

रत्नागिरी : रत्नागिरीतील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन एक जुलैपासून रत्नागिरीत पुन्हा एकदा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी, तसेच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (२८ जून) रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यंदा गणेशमूर्तींची उंची तीन फुटांपर्यंतच : उदय सामंत

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे. सार्वजनिक गणेशमूर्तींची उंची जास्तीत जास्त तीन फुटांपर्यंतच ठेवायचा निर्णय झाला आहे, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२४ जून) दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) मुंबईतून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कोकणाला पुन्हा वैभवाचे दिवस आणू – प्रवीण दरेकर

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छीमार उद्ध्वस्त झाले आहेत. आता पुन्हा कोकणला उभे करायचे आहे. कोकणाच्या दौ-यात कोकणाचे जे विदारक चित्र पाहिले, ते बदलायचे आहे, कोकणवासीयांना तात्कालिक मदत करायची आहे, तसेच शासनाने घोषित केलेली मदतही त्यांना मिळवून द्यायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या माध्यमातून आपण सारे मिळून कोकणाला पूर्वस्थितीत आणू, कोकणाला वैभवाचे दिवस पुन्हा आणू, असा ठाम विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी १६ जूनला व्यक्त केला.

चक्रीवादळामुळे रायगडात काही लाख घरांचे नुकसान; रत्नागिरीत तीन हजार झाडे जमीनदोस्त

रत्नागिरी/मुंबई : तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. तेथे तीन हजार झाडे आणि विजेचे एक हजार ९६२ खांब मोडून पडले आहेत. रत्नागिरीत महावितरणची १४ उपकेंद्रे कालच्या वादळात नादुरुस्त झाली असून, ती दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.