कोकण रेल्वेवर २४ सप्टेंबरला मुंबईसाठी दोन विशेष गाड्या

नवी मुंबई : : गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेमार्गावर रविवारी (दि २४ सप्टेंबर) दोन विशेष गाड्या धावणार आहेत. एक मडगाव – मुंबई मार्गावर, तर दुसरी खेड-पनवेल मार्गावर धावेल.

लोकप्रतिनिधी, प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे – लोढा

मुंबई : शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

कोकण रेल्वेवर ७ जुलै रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील वीर ते खेड या भागातील डागडुजीच्या कामासाठी येत्या ७ जुलै रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.

वंदे भारत एक्स्प्रेसचे कणकवली, रत्नागिरीत जल्लोषात स्वागत

कोकण रेल्वे मार्गावरील पहिली आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागली आहे. मडगाव–मुंबई या शुभारंभाच्या वंदे भारत एक्स्प्रेसला गोव्यातील मडगाव रेल्वेस्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून गाडीचा शुभारंभ केला. त्यानंतर विशेष निमंत्रितांना घेऊन गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. गाडीचे कणकवली आणि रत्नागिरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

… आणि कोकण रेल्वेमार्गावर ‘वंदे भारत’ रिकामीच धावली…!

वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमाची मडगाव स्टेशनवर जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच, ज्या ठिकाणी ती गाडी थांबणार होती, त्या प्रत्येक स्टेशनवरही गाडीच्या स्वागताची जंगी तयारी झाली होती. या पहिल्या गाडीतून प्रवास करण्यासाठी काही रेल्वे फॅन्स, तसेच पत्रकार मडगावमध्ये दाखल झाले होते; मात्र दुर्दैवी अपघातामुळे कार्यक्रम रद्द झाल्याने सर्वांचा उत्साह मावळला. वंदे भारत एक्स्प्रेस मडगावहून रिकामीच मुंबईला रवाना झाली. रत्नागिरीतील प्रा. उदय बोडस हेदेखील या गाडीतून पहिला प्रवास करण्यासाठी मडगावला दाखल झाले होते.

कोकण रेल्वेवरील वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक निश्चित

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई सीएसएमटी-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. शुक्रवार वगळता ही गाडी धावणार आहे.