मुंबई : करोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. १३) रात्री केली. उद्या, बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून १ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : करोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. १३) रात्री केली. उद्या, बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून १ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
मुंबई : करोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिपरिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता मिशन बिगिन अगेनच्या ऐवजी ब्रेक द चेन आदेश लागू राहणार आहेत. रात्रीची संचारबंदी आणि दिवसभर जमावबंदी असे या मोहिमेचे स्वरूप असेल. सोमवार ५ एप्रिलच्या रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाईल.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १० एप्रिल २०२०च्या अंकाचे संपादकीय…
करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात नागरिकांना शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी काम करत आहेतच, पण कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पूर्णपणे सेवावृत्तीने तीनशे हात प्रशासनाला मदत करत आहेत. जीवनावश्यक वस्तू घरोघरी पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक संस्था काम करत आहेत.
व्हॉट्सअॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील २२ अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली.
रत्नागिरी : रत्नागिरीच्या एमआयडीसीत अडकून पडलेल्या दोनशे तामिळी तरुणांची भोजनाची व्यवस्था रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, तर त्यांच्याकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना आलेल्या ट्विटर संदेशाची त्वरित दखल घेऊन मुंढे यांनी ही व्यवस्था केली.