आडिवरे : रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे-नवेदरवाडीतील नांदगावकर सुतार बंधू यांची सालाबादप्रमाणे होणारी श्री सत्यनारायण महापूजा यंदा ११ मार्च २०२० रोजी झाली. यंदा पूजेचे ६४वे वर्ष होते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक कारागीरांनी बनविलेल्या वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त अशा लाकडी वस्तूंचे प्रदर्शन हा सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू ठरला.
कारागीर कै. शंकर नांदगावकर (लाकडी मुखवटे, शिल्प), कै. रामचंद्र नांदगावकर (लाकडी शिल्प), कै. दशरथ नांदगावकर (खुर्ची), सहदेव नांदगावकर (छोटा रंधा), विशाल नांदगावकर (पाट), दत्ताराम नांदगावकर (स्टूल), किरण नांदगावकर (पायपेटी), दुर्गेश नांदगावकर (लाकडी गिटार), प्रमोद मेस्त्री (टू इन वन खुर्ची-घोडा), अंकुश पांचाळ (साखळी), रविकांत पांचाळ (पर्ससीन नौका), किरण पांचाळ (टेबल मोरावळी) अशा विविध कारागीरांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या एकूण २७ वस्तूंचा या प्रदर्शनात समावेश होता. युवा मंडळ कार्याध्यक्ष अभिजित नांदगावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाला अध्यक्ष जितेंद्र नांदगावकर, सचिन वैभव नांदगावकर, गुरुदेव नांदगावकर यांच्यासह सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन लांजा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण सुतार (अध्यक्ष, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ, लांजा) यांच्या हस्ते झाले. या वेळी राजापूर-मूर गावचे सरपंच संजय सुतार (कार्याध्यक्ष, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ, राजापूर), संतोष पांचाळ (उपाध्यक्ष) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी नवेदर गावातील गावकार संजय नांदगावकर, दिवाकर नांदगावकर, सतीश नांदगावकर, सहदेव नांदगावकर, अरविंद नांदगावकर, पुरुषोत्तम नांदगावकर, सुनील नांदगावकर, संजय नांदगावकर, दिपश्री नांदगावकर, भरत नांदगावकर, सुनील नांदगावकर, महादेव नांदगावकर, नांदगावकर सुतार युवा सर्व सेवा युवा मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र नांदगावकर, सचिव वैभव नांदगावकर, गुरुदेव नांदगावकर आदी सर्व सदस्य, तसेच समस्त नांदगावकर बंधू-भगिनी उपस्थित होते.
(या प्रदर्शनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत. व्हिडिओ ओपन होत नसेल तर कृपया येथे क्लिक करा.)
