रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ जून) २० करोना रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ४२० झाली आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत १५० जणांनी करोनावर मात केली आहे.
रत्नागिरीतील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात काल (२६ जून) सायंकाळपासून ३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५४ झाली आहे. काल सापडलेल्या ३५ रुग्णांचा तपशील असा –
रत्नागिरी तालुका – भाट्ये – १, चर्मालय – १, शिरगाव – २, मारुती मंदिर – १, खेडशी – २, समर्थनगर – १, गावडे आंबेरे – २, मालगुंड – १, साठरेबांबर – १, नवेल – १, कुवेशी – १, राजिवडा – १
राजापूर तालुका – धाऊलवल्ली – १
लांजा तालुका – इसवली – १
चिपळूण तालुका – चिपळूण शहर – १, कापसाळ – २, ओवळी – १
दापोली तालुका – आडे – २, विसापूर – २, हर्णै – १, फुरुस – ६
खेड तालुका – भरणे – २, घरडा लवेल – १
सध्या रुग्णालयात असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १११ आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. हा अहवाल २७ जून रोजी सायंकाळपर्यंतचा आहे.
आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून १२, समाजकल्याण, रत्नागिरी येथून सात आणि आयटीआय संगमेश्वर येथून एक अशा २० रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
ॲक्टिव्ह कन्टेंमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या ४८ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १९ गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये १, संगमेश्वर तालुक्यात १, दापोलीमध्ये ५ गावांमध्ये, खेडमध्ये ८ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात ६ गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात दोन गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणाची विविध रुग्णालयांतील स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ३४, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – २, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी – १, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – १७ असे एकूण ५५ संशयित करोना रुग्ण दाखल आहेत.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या २२ हजार १२३ इतकी आहे.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात २६ जूनपर्यंत एकूण एक लाख ५५ हजार १३० व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत, तसेच इतर जिल्ह्या,त गेलेल्यांची संख्या ८१ हजार ३१५ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील आठ जणांचा, तर मालवण तालुक्यातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४४ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत एकूण १५० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
…….
