रत्नागिरी : जिल्ह्यात आज (५ जुलै) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे नवे १४ रुग्ण आढळले असून, एका आरोग्य सहायकासह दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनामुळे आरोग्य कर्मचारी दगावण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, दिवसभरात २३ रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे. सिंधुदुर्गात आज सहा जणांना घरी सोडण्यात आले.
रत्नागिरीतील परिस्थिती
काल सायंकाळपासून जिल्ह्यात नवे १४ करोनाबाधित आढळले. त्यांचे विवरण असे – जिल्हा रुग्णालय – ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ६, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – २.
बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आलेल्या २३ जणांचा तपशील असा – कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १०, जिल्हा रुग्णालय – २, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे – १०, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – १.
आज सकाळी दाभोळ (ता. दापोली) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचे वय ६० वर्षांचे होते. त्या रुग्णाला मधुमेह, रक्तदाबाचा विकार होता. तसेच एकदा हृदयविकारचा झटका येऊन गेला होता. रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी झाला होता. त्याचे स्वॅब तपासणी पाठविण्यात आले होते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आंजर्ले (ता. दापोली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य सहाय्यकाचा दुपारी मृत्यू झाला. गेल्या १ जुलै रोजी त्याला दाखल करण्यात आले होते. त्याला ताप आणि श्वसनाचा त्रास होता. त्याला जिल्हा रुग्णालयात येथे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज दुपारी त्याचा मृत्यू झाला. संतोष गुणाजी शिगवण असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या २८ झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आज सायंकाळची करोनाविषयक स्थिती अशी – एकूण बाधित – ७१०, बरे झालेले – ४८४, मृत्यू – २८, ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह – १९८ (पैकी चौघांवर रुग्णालयाबाहेर उपचार सुरू आहेत.)
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गा जिल्ह्यात आज आणखी एका व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या २४३ झाली आहे. काल (चार जुलै) सात व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील दोन, जानवली येथील तीन आणि मालवण तालुक्यातील आचरा येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज सहा जणांनी करोनावर मात केली असून, या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६३ जणांवर उपचार सुरू आहेत.
…..


