आठ जुलैला अखिल भारतीय कोकणी परिसंवादाचे ऑनलाइन आयोजन

पणजी : अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या वतीने आठ जुलै २०२० रोजी अखिल भारतीय कोकणी परिषदेचा ८२वा वर्धापनदिन ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे. प्रति वर्षी हा उत्सव पणजी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या वर्षी करोना संकटामुळे हा कार्यक्रम मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार असून, ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी महानगरपालिकेच्या इंडियन रेड क्रॉस हॉलमध्ये गोवा राजभाषा संचालनालयाच्या संचालिका श्रीमती मेघना शेटगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अध्यक्षा उषा राणे यांनी दिली.

उद्घाटनाचा कार्यक्रम मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर ‘कोविड-19 नंतरची कोकणी’ या विषयावर ऑनलाइन परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात देश-परदेशातील कोकणी भाषातज्ज्ञ सहभागी होणार आहेत. कोकणी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकणी भाषा साहित्य अकादमीचे सल्लागार भूषण भावे या परिसंवादाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. मालवणीतून आपले विचार मांडण्यासाठी सुरेश ठाकूर (अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याशिवाय, प्रकाश वजरीकर (गोवा), गुरू बाळिगा (कर्नाटक), हरेंद्र शर्मा (केरळ), लॉरेन्स कामानी (मुंबई), सुमन कुराडे (नवी दिल्ली), स्नेहा सबनीस (गोवा), पंकज नाडकर्णी (दुबई) आणि फ्रेन्की फर्नांडिस (ऑस्ट्रेलिया) हे सर्व जण कोकणीतून आपले विचार मांडणार आहेत.

सुरेश ठाकूर यांना मालवणीतून आपले विचार मांडण्याची संधी संयोजकांनी दिली आहे. अखिल भारतीय स्तरावरील परिसंवादासाठी निवड झाल्याबद्दल रुजारिओ पिंटो (सल्लागार समिती सदस्य, साहित्य अकादमी नवी दिल्ली, कोकणी भाषा), मंगेश मस्के (अध्यक्ष, कोमसाप, सिंधुदुर्ग) यांनी सुरेश ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.

(आचरे गावातली रामनवमी हा सुरेश ठाकूर यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(सुरंगी ही सिद्धी नितीन महाजन यांनी लिहिलेली कोकणी बोलीतील कथा वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.)

……….
या परिसंवादाचे उषा राणे यांनी कोकणी भाषेत लिहिलेले आमंत्रण

८ जुलय २०२० – अखिल भारतीय कोंकणी परिशदेचो ८२वो वर्धापन दीस.
कोवीद १९ महामारेक लागून ही कार्यावळ उक्तेपणान करुंक शकनात. परिशदेचे कार्यांत खंड पडनये ह्या उद्देशान हो दीस online मनोवपाचे थारला. इंडिअन रेडक्रॉस हॉल, पणजी हांगा ह्या कार्यावळींचे पाच, स लोकांचे उपस्थितीत उक्तावण सुवाळो जातलो.
हे वेळार मुखेल सोयरी भौ. मेघना शेटगांवकर, संचालक, राजभाशा संचालनालय, गोंय, हांची उपस्थिती आसतली.
परिशदे वतीन शशिकांत पुनाजी, खजिनदार, सुनिता काणेकर, उपाध्यक्ष, डॉ. भूषण भावे, निमंत्रक, साहित्य अकादमी कोंकणी भाशा. आनी हेर मान्यवर हाजीर आसतले.
उपरांत “कोवीद 19 उपरांत कोंकणी” ह्या विशयाचेर ऑनलायन परिसंवाद जातलो. ह्या परिसंवादाचे अध्यक्षपद भौ. भूषण भावे सोबयतले.
परिसंवादात प्रकाश वजरीकार गोंय, गुरु बाळीगा कर्नाटक, हरेंद्र शर्मा केरळ, लॉरेन्स कामानी मुंबय, सुमन कुराडे दिल्ली, सुरेश ठाकूर मालवण, रत्ना दिवकर गोंय, स्नेहा सबनीस गोंय, पंकज नाडकर्णी दुबय, आनी फ्रेंकी फॅर्नांडीस ऑस्ट्रेलिया हे वांटेकार जातले.
ही कार्यावळ सगळ्या खातीर लायव आसतली. Facebook आनी Zoom app. live आसतली परीशदेन दिल्या लिंकार वचून सगळ्यांनी ही कार्यावळ पळोवची.

उषा राणे,
अध्यक्ष,
अ. भा. कों. प.
……..

Leave a Reply