रत्नागिरीची करोना रुग्णसंख्या ३०१८; तपासणीचा एकही अहवाल प्रलंबित नाही

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयामार्फत करोनाविषयक चाचणीसाठी पाठविलेल्या सर्व नमुन्यांचा अहवाल मिळाला आहे. प्रयोगशाळेकडे सध्या एकही अहवाल प्रलंबित राहिलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पूर्वी मिरज आणि कोल्हापूरच्या प्रयोगशाळेकडे पाठवावे लागत असत. ९ जून रोजी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर चाचणीच्या कामाला वेग आला आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत (१८ ऑगस्ट) एकूण २२ हजार ३५८ नमुने तपासण्यात आले. त्या सर्वांचे अहवाल मिळाले आहेत. त्यातील ३०१८ अहवाल पॉझिटिव्ह, तर १९ हजार ३२८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत ६४, तर आरटीपीसीआर चाचणीत ९ असे एकूण ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ९, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी २८, दापोली २२, संगमेश्वर १, घरडा रुग्णालय १३. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०१८ झाली आहे.

आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून ८, कामथे, चिपळूण येथून १, समाजकल्याण, रत्नागिरी येथून ६, घरडा, लवेल, खेड येथून ३ अशा १८ जणांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १८६५ झाली आहे.

दरम्यान, आज रत्नागिरी येथील ४० वर्षीय, तसेच काजुर्ली, ता. गुहागर येथील ४२ वर्षीय रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता १०७ झाली आहे. मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ३५, खेड १२, गुहागर ४, दापोली २०, चिपळूण १८, संगमेश्वर ८, लांजा २, राजापूर ७, मंडणगड १.

विविध रुग्णालयांमधील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०४६ आहे.

जिल्ह्यात सध्या १८२ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – १७, दापोली १०, खेड ३१, लांजा ९, चिपळूण ९३, मंडणगड २, राजापूर ११, गुहागर ९.

संस्थात्मक विलगीकरणात १४१ जण असून त्यांची रुग्णालयनिहाय आकडेवारी अशी – जिल्हा रुग्णालय ४२, समाजकल्याण, रत्नागिरी ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे ५४, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी ३, कोव्हिड केअर सेंटर, घरडा २, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ७, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २०, गुहागर ५, उपजिल्हा रुग्णलय, दापोली १, पाचल १.

मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्यामुळे ४३ हजार ३०३ जण होम क्वारंटाइन आहेत. परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात एकूण दोन लाख ८५ हजार ९७० व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ६७६वर पोहोचली आहे. त्यापैकी ४५६ जण करोनामुक्त झाले आहेत. २०६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, १४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७९ कंटेन्मेंट झोन आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply