दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक २१वा)

भाद्रपद कृ. षष्ठी, शके १९४२

॥ श्रीराम ॥
नट नाट्य कळांकुसरी ।
नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदुंग भरोवरी ।
उपांग हुंकारे ॥२१॥

अर्थ : अनेक प्रकारचे हावभाव दाखवून कला आणि कौशल्य यांनी संपन्न असे अनेक तऱ्हेचे नृत्य तो करतो. साथीला टाळ आणि मृदुंग ही वाद्ये असतात. मधूनमधून त्याचा हुंकार त्यामध्ये भर घालतो. हुंकार करणे हे नृत्याचेच एक गौण अंग आहे.

…….

१९ ऑगस्ट २०२०पासून भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही देण्यात येत आहे. गणेशस्तवनातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

……….

एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply