रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातर्फे आज (ता. ७) प्रसिद्धीला दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचे स्पष्ट झाले. आज जिल्ह्यात १०६ रुग्ण आढळले. आज चौघांचा मृत्यूही नोंदविला गेला. सिंधुदुर्गात आज ७६ रुग्णांची वाढ झाली.
रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – खेड २३, गुहागर ६, चिपळूण २१, संगमेश्वर १७, रत्नागिरी ११, लांजा २ (एकूण ८०). रॅपिड अँटीजेन टेस्ट – गुहागर २, चिपळूण ४, संगमेश्वर १, रत्नागिरी ११, लांजा ८. (एकूण २६). एकूण रुग्ण ४९६१.
रत्नागिरी जिल्ह्यात आज चौघा पुरुष रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यातील अनुक्रमे ४१ आणि ८४ वर्षे वयाचे दोघे चिपळूण तालुक्यातील, ६५ वर्षांचा रुग्ण खेड तालुक्यातील, तर ८० वर्षीय रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील आहे. तालुकानिहाय मृतांची आकडेवारी अशी – मंडणगड २, खेड १७, दापोली २२, चिपळूण ३१, गुहागर ४, संगमेश्वर १२, रत्नागिरी ४४, लांजा ५, राजापूर ८ (एकूण १४९). मृतांचे हे प्रमाण ३ टक्के आहे.
आज ४२ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत ३०६० जण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण ६१.६८ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ७६ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १९०९ झाली आहे. आतापर्यंत ९२० जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १७७ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८८८७ व्यक्ती क्वारंटाइन आहेत.
