दापोली-खेड रस्त्यावर पितांबरी नर्सरी शॉपी सुरू; वैविध्यपूर्ण रोपांची उपलब्धता

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड रस्त्यावर नारगोली येथे ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे पितांबरी नर्सरी शॉपी सुरू करण्यात आली आहे. ‘पितांबरी’चे सीईओ मधुकर पुजारी यांच्या हस्ते नुकतेच या शॉपीचे उद्घाटन करण्यात आले. ‘पितांबरी’चे प्रॉडक्शन हेड अमित काळे, पितांबरी नर्सरीचे प्रमुख गुरुप्रसाद बेर्डे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर पराग साळवी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

सर्व प्रकारची फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती आणि बागेसाठी लागणाऱ्या वनस्पतींची रोपे या शॉपीत उपलब्ध होणार आहेत. विविध ठिकाणांहून उच्च प्रतीच्या बियाण्याचे संकलन करून दापोलीजवळ साखळोली येथील ‘पितांबरी फार्म’वर या रोपांची शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्मिती केली जाते. उत्तम सुगंधाचा सौंदर्या जातीचा सोनचाफा, अगरबत्तीच्या काड्यांसाठी उपयुक्‍त तुल्डा जातीचा बांबू, सागवान, आंबा, काजू, चंदन आदी रोपांचा यात समावेश आहे.

या नर्सरीत तैवान पिंक पेरू या एक किलो वजनाचे फळ देणाऱ्या पेरूची टिश्यू कल्चर्ड रोपे, कागदी लिंबू, सुपर – १ या तीन फूट उंचीवर लागणाऱ्या नारळाची रोपे, श्रीवर्धन रोठा सुपारी यासोबतच अनेक प्रकारची रोपे उपलब्ध आहेत.

ही नर्सरी मुख्य रस्त्यालगत आणि दर्शनी भागात असल्याने ग्राहकांकरिता अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे. शेतकरी बांधवांनी व वृक्षप्रेमींनी या नर्सरीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन पितांबरीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२०१ ५४१६५

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. Pitambari, khupach Stutya Upakram. Nisargashi julaleli hi NAAL ashich ghatta rahudya.
    Ya nisarga thevyala bhet dyayala nakkich awadel.
    Dhanyawad.
    Anand G Mayekar
    Thane.

Leave a Reply