रत्नागिरीत ३८, तर सिंधुदुर्गात ४६ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (आठ ऑक्टोबर) करोनाचे नवे ३८ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ७८७३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४६ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४२६८ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तीचे प्रमाण ८८.२७ टक्के झाले आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज बरे झालेल्या १०९ करोनाबाधितांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ६९५० झाली आहे. करोनामुक्तीचे हे प्रमाण ८८.२७ टक्के आहे.

आज करोनाचे नवे ३८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७८७३ झाली आहे. आजपर्यंत ४१ हजार ४३८ चाचण्या झाल्या आहेत.

आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – दापोली २, गुहागर १, रत्नागिरी १०, लांजा २, राजापूर १, देवरुख ७, कामथे १, कळंबणी १ एकूण २५). रॅपीड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी ३, कामथे २, गुहागर १, कळंबणी ६, दापोली १ (एकूण १३). (दोन्ही मिळून ३८)

आज करोनाच्या पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हे पाचही मृत्यू सरकारी रुग्णालयात झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील ६० वर्षांचा एक पुरुष आणि रत्नागिरी तालुक्यातील ७४ वर्षांची महिला यांचा मृत्यू सात ऑक्टोबरला झाला. संगमेश्वर तालुक्यातील ७५ वर्षांचा पुरुष, खेड तालुक्यातील ६१ वर्षांचा पुरुष आणि गुहागर तालुक्यातील ६६ वर्षांचा पुरुष यांचा मृत्यू आठ ऑक्टोबरला झाला.

जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २९० झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६८ टक्के झाला आहे. आतापर्यंतच्या तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७८, खेड ४८, गुहागर ११, दापोली ३१, चिपळूण ६९, संगमेश्वर २९, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २ (एकूण २९०).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (आठ ऑक्टोबर) आणखी ४६ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४२६८ झाली आहे. आतापर्यंत ३३७४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १११ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply