माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक क्र. ३० ते ३३

१८ सप्टेंबर २०२०पासून अधिक आश्विन शके १९४२ हा महिना सुरू झाला आहे. त्या निमित्ताने या महिन्याचे महत्त्व विशद करणाऱ्या मालिकेचा आज शेवटचा भाग
……

१६ ऑक्टोबर २०२०
अधिक आश्विन अमावास्या शके १९४२

इति विज्ञाप्य भूमानं बद्धाञ्जलिपुटो हरिः।
पुरस्तस्थौ भगवान निरीक्षंस्तन्मुखाम्बुजम् ।।३०।।

अर्थ : परमात्मा श्रीकृष्णाच्या समोर हात जोडून उभे राहून अधिक मासाचे सर्व दुःख त्यांना सांगून श्री विष्णू त्यांच्या मुखकमलाकडे पाहू लागले.
…………

श्री पुरुषोत्तम उवाच
समीचीनं कृतं विष्णो यदत्रागतवान् भवान् ।
मलमासं करे कृत्वा लोके कीर्तिमवाप्स्यसि।।३१।।

अर्थ : श्री पुरुषोत्तम (श्रीकृष्ण) म्हणाले, हे विष्णो, आपण या मलमासाला घेऊन माझ्याकडे आलात हे योग्यच केलेत, या कामामुळे जगात आपल्याला कीर्ती लाभेल.
…………

अहमेतैर्यथालोके प्रथितः पुरुषोत्तमः।
तथाऽयमपि लोकेषु प्रथितः पुरुषोत्तमः।।३२।।

अर्थ : मी जसा या जगामध्ये ‘पुरुषोत्तम’ म्हणून प्रसिद्ध आहे, तसाच हासुद्धा ‘पुरुषोत्तम’ म्हणूनच प्रसिद्ध होईल.
…………

अस्मै समर्पिताः सर्वै ये गुणा मयि संस्थिताः।
पुरुषोत्तमेति यन्नाम प्रथितं लोकवेदयोः ।।३३।।

अर्थ : माझ्यामध्ये जे जे गुण आहेत, ते ते सर्व मी याला अर्पण केले आहेत. आता जग याला पुरुषोत्तम मास म्हणून ओळखेल.

इति श्रीबृहन्नारदीयपुराणे पुरुषोत्तममासमहात्म्ये श्रीनारायणनारदसंवादे पुरुषोत्तमविज्ञप्तिर्नाम षष्ठोऽध्यायः।।
…………

अधिकमासाविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी, तसेच या अध्यायातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..

अधिक महिन्याचे महत्त्व सांगणारी मोठी पोथी आहे. महिन्यातील प्रत्येक दिवसानुसार ३१ दिवसांचे महत्त्व त्यात सांगितले गेले आहे. प्रत्येक अध्यायात ३० ते ५५ असे सुमारे १२०० श्लोक आहेत. श्रीकृष्णाने अधिकमासाचे दुःख दूर करून त्याला ‘पुरुषोत्तम मास’ असे नाव दिले, ही कथा सहाव्या अध्यायात आहे. संस्कृतमध्ये असलेल्या या पोथीविषयी कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने त्या सहाव्या अध्यायातील श्लोकांचा अर्थ येथे दिला जात आहे. हा अनुवाद रत्नागिरीच्या फाटक प्रशालेतील माजी शिक्षिका सौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई यांनी करून दिला आहे. सौ. प्रभुदेसाई एमए, बीएड, पंडित आहेत. त्यांनी फाटक प्रशालेत संस्कृत आणि इंग्रजीचे अध्यापन केले आहे. त्या सध्या गतिमंद मुलांसाठी निःशुल्क मार्गदर्शन करत आहेत.
……..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply