रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ ऑक्टोबर) फक्त १२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच आज ८७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३० नवे रुग्ण आढळले असून, ५७ जण करोनामुक्त झाले आहेत.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ ऑक्टोबर) ८७ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७३८४ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९०.२९ टक्के आहे.
जिल्ह्यात आज नवे १२ रुग्ण आढळले. त्यापैकी सात जण आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर पाच जण रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर जण करोनाबाधित असल्याचे नक्की झाले. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – चिपळूण ६, रत्नागिरी १ (एकूण ७). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली १, रत्नागिरी २, लांजा २ (एकूण ५) (दोन्ही मिळून १२)
जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८१७८ झाली आहे. बाधितांचा दर १५.४८ टक्के आहे. सध्या ४०१ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हे दोन्ही मृत्यू सरकारी रुग्णालयात झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ६२ वर्षांच्या महिलेचा १५ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. तसेच राजापूर तालुक्यातील ५७ वर्षांच्या पुरुषाचा १६ ऑक्टोबरला मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता ३०२ झाली असून, जिल्ह्याचा मृत्यूदर ३.६९ टक्के आहे.
मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८२, खेड ४९, गुहागर ११, दापोली ३२, चिपळूण ७१, संगमेश्वर ३२, लांजा १०, राजापूर १३, मंडणगड २.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ ऑक्टोबर) आणखी ३० व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४५२० झाली आहे. आतापर्यंत ३८०३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कणकवली शहरातील पटकीदेवी येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.
मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली ३०, कुडाळ २०, मालवण १२, सावंतवाडी २८, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १