Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५४० करोनाबाधित

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ जून) करोनाचे नवे ५४० रुग्ण आढळले. आज १७९ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २४६, अँटिजेन चाचणी – १६३ (एकूण ४०९). आधी नोंद न झालेल्या १३१ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ५४० आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ५९ हजार ५६ झाली आहे.

आज सहा हजार २०३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज सहा हजार ७४३ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ३८ हजार ६५० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज १७९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५१ हजार १६२ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८६.६३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ६९१ झाली आहे. मृत्युदर २.८४ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५५१, खेड १६५, गुहागर १३६, दापोली १४१, चिपळूण ३२८, संगमेश्वर १४७, लांजा ८९, राजापूर ९९, मंडणगड २२ (एकूण १६७८).

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version