रत्नागिरी जिल्ह्यात नवे ४२३ करोनाबाधित, ३८८ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (2 जुलै) ४२३ नवे करोनाबाधित आढळले, तर ३८८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या एक हजार ८०० च्या वर गेली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १७९, अँटिजेन चाचणी – १८५ (एकूण ३६४). आधी नोंद न झालेल्या ५९ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ४२३ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६३ हजार ३७ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.८७ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १४.१८ टक्के आहे.

आज सहा हजार १०२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात दोन हजार ६९६ गृह विलगीकरणात, दोन हजार ८५० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ५५६ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज पाच हजार ६०१ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ८८ हजार ६३० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३८८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५५ हजार १३० झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.६७ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८०५ झाली आहे. मृत्युदर २.८६ टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५९०, खेड १६९, गुहागर १३८, दापोली १५१, चिपळूण ३५३, संगमेश्वर १६४, लांजा ९४, राजापूर १०७, मंडणगड २५. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८०५).
……..

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply