सिंधुदुर्गात करोनाचे रुग्ण घटले, करोनामुक्त अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे.

आज, २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ३२३ आणि एकूण ३६ हजार ६२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे २९४ करोनाबाधित आढळले.

सध्या जिल्ह्यात ५ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या दोघांसह २९४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६६, दोडामार्ग – ९, कणकवली – ५३, कुडाळ – ७४, मालवण – २६, सावंतवाडी – २०, वैभववाडी – २२, वेंगुर्ले – २२. एकूण करोनाबाधितांची संख्या ४२ हजार २९५ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६०९, दोडामार्ग २१०, कणकवली ८८५, कुडाळ १२३२, मालवण ८६१, सावंतवाडी ५८४, वैभववाडी २४०, वेंगुर्ले ५३०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १७. सक्रिय रुग्णांपैकी २४४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०६३ झाली आहे. आज नोंद झालेल्या दोन आणि आधी मरण पावलेल्या आणि आज नोंद झालेल्या एका मृताचा तपशील असा – देवगड १, कुडाळ १, मालवण १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १३९, दोडामार्ग – ३१, कणकवली – २१३, कुडाळ – १६१, मालवण – २१५, सावंतवाडी – १५०, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ८१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.
………….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply