रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५२४ करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० जून) ५२४ नवे करोनाबाधित आढळले. आज २०२ रुग्ण करोनामुक्त झाले.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २३०, अँटिजेन चाचणी – २१४ (एकूण ४४४). आधी नोंद न झालेल्या ८० रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ५२४ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६२ हजार १०० झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.९८ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १४.४१ टक्के आहे.

आज सहा हजार २४१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज सात हजार १३५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ७५ हजार ९७० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज २०२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५४ हजार ८१ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.२४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ७७८ झाली आहे. मृत्युदर २.८७ टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५७९, खेड १६७, गुहागर १३८, दापोली १५०, चिपळूण ३५०, संगमेश्वर १५९, लांजा ९२, राजापूर १०४, मंडणगड २५. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १७७८).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply