खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा तिसरा वर्धापन दिन

रत्नागिरीत स्थापन झालेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा २० नोव्हेंबर हा तिसरा वर्धापनदिन. पाहता पाहता सर्वांच्या नजरेसमोर ही विश्वासार्ह वाटचाल ३ वर्षांची झाली. पतसंस्था जगतात रत्नागिरी जिल्ह्यात ‘खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे’ नाव सर्वमान्य झाले आहे.

सन २०१९- २० व २०२०-२०२१ ही दोन आर्थिक वर्षे करोनाच्या महामारीनेने ग्रासलेली आर्थिक वर्षे होती. दीर्घकालीन लॉकडाउनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही
अर्थकारणाची गती राखण्याचे आव्हान खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत पतसंस्थेने आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णु केला आहे.

तीन वर्षांत ३८९५ ग्राहक सभासदांच्या जवळ दृढ केलेले भावबंध, ५ कोटी २१ लाखाच्या ठेवी, ४ कोटी ९ लाखाची कर्जे, १ कोटी ३८ लाखाची गुंतवणूक, ६ कोटी ३९ लाखांचे खेळते भांडवल , सलग ३ वर्षे ऑडिटचा अ वर्ग प्राप्त, आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था हा संस्थेचा लौकिक आहे.

प्रधान कार्यालय आणि एका सेवाकेंद्राच्या माध्यमातून झालेला कार्यविस्तार आणि या विस्ताराच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे संचालक मंडळ, ५ कर्मचारी आणि त्यात नव्यानेच १३ जणांच्या जिल्हा समन्वय समिती सदस्यांच्या सहकार्याची जोड लाभली. तीन वर्षांत झालेले हे मार्गक्रमण संपूर्ण जिल्ह्याला गवसणी घालते झाले.

अत्यल्प थकबाकी, विक्रमी वसुली करणारी पतसंस्था म्हणून संस्थेने नाव कमावले आहे. आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून पतसंस्था विस्तारत आहे. सहकारातील सामूहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञान, व्यवसाय-संधी यांचा कायद्याच्या परिघात राहत अचूक लाभ उठवत ग्राहकांनाही या लाभात सहभागी करून घेणारी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था

म्हणजे सहकारातला हा प्रवास खूप अनुभव आहे. सहकारात रचनात्मक काम करणाऱ्या अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संपर्क होत आहे. त्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अनुभवाची समृद्ध शिदोरी या प्रवासामुळे प्राप्त झाली.

अध्यक्ष म्हणून काम करताना कर्तव्याला प्राधान्य देत नवनवीन धोरण ठरवत, निर्णय घेत त्याचे क्रियान्वयन करण्यासाठी आग्रही राहण्याचे कर्तव्य बजावताना खूप समाधान मिळते. खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या या आर्थिक विश्वात विश्वासार्हता जपत-वाढवत आहोत. विश्वासार्हतेच्या मजबूत पायावर आता सातत्याने उंचउंच वाढणारी खारवी समाज विकास पतसंस्था आपल्याला पाहायला अनुभवायला मिळते आहे.

तीन वर्षांचा हा प्रवास समृद्धतेचा आहे. लक्ष्मी, श्रमदेवता आणि सरस्वती या त्रयींचा आशीर्वाद लाभलेली आणि व्रतस्थ भूमिकेतून काम करणाऱ्या या पतसंस्थेला सर्वांच्या सदिच्छा, सहकार्य अविरत मिळावे, हीच अपेक्षा. हा अर्थविस्तार अखंड अग्रेसर होत राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

तिसऱ्या वर्धापनदिनी सर्व संचालक मंडळ सदस्य, समन्वय समिती सदस्य, प्रशासन वर्ग, सभासद, कर्जदार, ठेवीदार, पिग्मी खातेदार, हितचिंतक या सर्वांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद!

  • संतोष पावरी,
    अध्यक्ष,
    खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी जिल्हा

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply