Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २९ रुग्ण, ११५ करोनामुक्त

coronavirus

Photo by CDC on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ फेब्रुवारी) २९ नवे रुग्ण आढळले, तर ११५ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार २५० रुग्ण आढळले असून त्यापैकी ८१ हजार २३२ म्हणजे ९६.४२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ९५८ पैकी ९४१ निगेटिव्ह, तर १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ६४८ पैकी ६३९ नमुने निगेटिव्ह, तर १२ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख १३ हजार ५६५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ४०६ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले २१९, तर लक्षणे असलेले १८७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २१९ असून, संस्थात्मक विलगीकरणात १८७ जण आहेत. एकूण ८६ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ७९, तर डीसीएचमध्ये १०८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी ८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ८ रुग्ण दाखल आहेत.

याआधी मरण पावलेल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५२६ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.२३ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. आधी मरण पावलेल्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाल्याने आजचा मृत्युदर ० टक्के आहे, तर एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १८०, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३९, लांजा १३२, राजापूर १६७. (एकूण २,५२६).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात १० फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ७५ सत्रे पार पडली. त्यात २८३ जणांनी लशीचा पहिला, तर २,२०७ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २,४९० जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ८६१, तर ४८६ जणांनी बूस्टर डोस घेतले. १० जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५० हजार ७० जणांचा पहिला, तर ८ लाख ३७ हजार १६१ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ८८ हजार २३१ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version