Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

परशुराम घाटातील मेगाब्लॉकच्या वेळेत बदल

Advertisements

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबद्दलचा आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी २२ एप्रिलला जाहीर केला होता. त्या मेगाब्लॉकच्या वेळेत बदल झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या २ मे रोजीच्या पत्रकात म्हटले आहे. आता मेगाब्लॉकची वेळ दररोज दुपारी १२ ते सायंकाळी सहा अशी असेल. हा मेगाब्लॉक २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. वेळेचा बदल वगळता पूर्वीच्या आदेशातल्या सर्व अटी आणि शर्ती कायम राहतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मेगाब्लॉकच्या काळात अवजड वाहनांची वाहतूक मुंबई-पुणे मार्गे आणि चिपळूण-कराड मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच, अवजड वगळता अन्य सर्व कमी वजनाच्या वाहनांची वाहतूक आंबडस-चिरणी-लोटे रस्ता आणि कळंबस्ते-आंबडस-धामणंद या रस्त्याने वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कमी वजनाच्या वाहनांसाठीच्या पर्यायी मार्गाचा गुगल मॅप, तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा आधीचा (२२ एप्रिल) आदेश सोबत देत आहोत.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version