सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा लांज्यात ७ ऑगस्टला सत्कार

लांजा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत राष्ट्रभक्ती रुजविण्यासाठी लांजावासीयांनी पुढाकार घेतला असून भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा लांज्यात भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र रामदास अनंत वाघाटे येत्या रविवारी (दि. ७ ऑगस्ट) भारतीय सैन्य दलातील (बी.एस.एफ.) १९३ बटालियनमध्ये २३ वर्षे देशसेवा केल्यानंतर निवृत्त होऊन आपल्या गावी येत आहेत. प्रखर राष्ट्रनिष्ठा, असामान्य कर्तृत्व, दुर्दम्य आशवादाच्या जोरावर गेली २३ वर्षे देशाच्या सीमेवर समर्पित वृत्तीने लढणारे जवान श्री. वाघाटे यांचा यानिमित्ताने लांजावासीयांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

राष्ट्रसेवा करण्यासाठी, सैन्यदलात भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. देशात स्वातंत्र्य्चाय अमृतमहोत्सवानिमित्ताने घरोघरी तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर लांज्यात सेवानिवृत्त सैनिकाचा होणारा सत्कार जीवन कसे जगावे, यापेक्षा देशासाठी ते कसे झुगारावे तसेच भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या उक्तीचा आदर्श घालून देणारा ठरणार आहे. या सोहळ्यासाठी श्री वाघाटे यांचा मित्रपरिवार पुढाकार घेत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply