वाशिष्ठीच्या दूध संकलन केंद्राचा मालघरमध्ये शुभारंभ

चिपळूण : येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् या दुग्धप्रकल्पाअंतर्गत वाशिष्ठी पंचक्रोशी दूध उत्पादक सहकारी संस्था (पिंपळी खुर्द, चिपळूण) या संस्थेच्या मालघर येथील दूध संकलन केंद्राचा आज प्रारंभ झाला.

वाशिष्ठी दुग्धप्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान या प्रकल्पांतर्गत दूध संकलनासाठी ठिकठिकाणी संकलन केंद्रे सुरू करण्याचा प्रकल्पाच्या संचालकांचा मानस आहे. या अंतर्गत पहिल्या दूध संकलन केंद्राचे चिपळूण तालुक्यातील मालघर येथे आज उद्घाटन झाले. परिसरात दूध संकलन केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाशिष्ठी पंचक्रोशी दूध उत्पादक सहकारी संस्थेला धन्यवाद दिले.

मालघर येथील दूध संकलन केंद्रात गाय आणि म्हैस यांचे प्रत्येकी एक हजार लिटर दूध संकलन करण्याची क्षमता आहे. टप्प्याटप्प्याने ठिकठिकाणी असे दूध संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाशिष्ठी डेअरीसाठी दुधाचा पुरवठा करणे सुकर होणार आहे.

मालघरमधील दूध संकलन केंद्राच्या उद्धघाटनप्रसंगी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् या प्रकल्पाच्या संचालिका सौ. स्वप्ना प्रशांत यादव, महेंद्र खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, कु. स्वामिनी यादव, प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप मगदूम, गणपत तटकरे, रमेश ठसाळे, सखाराम किलजे, सुनील वाजे, सुनील टेरवकर, वैभव पवार, गंगाराम महाडिक, विजय वाजे, धनंजय किलजे, नंदू किलजे, अजय वाजे, संजय मिरगल, महेश किलजे, किशोर, ठसाळे, प्रभाकर तटकरे, महेश किलजे, सुनील तांबडे, संदीप खेडेकर, प्रमोद ठसाळे, मानसी विजय वाजे, वासंती विजय घोले, सायली सुनील वाजे, शामल शाम वाजे, वैष्णवी विजय चिले, सुविधा सुरेश वाजे, सरिता सीताराम घोले, सुप्रिया सदाशिव चिले आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply