Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

नागपूर मडगाव विशेष रेल्वे गाडीला २६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Advertisements

नवी मुंबई : नागपूर-विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला २६ फेब्रुवारी २३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. दीपावली आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी जानेवारी २०२३पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र या गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष गाडीला पेण, मनमाड, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, नांदुरा, शेगाव, मूर्तिजापूर थांबा मंजूर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे, रेल्वे बोर्ड, रस्ते वाहतूक दळणवळण महामार्ग राजमार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version