डॉ. तानाजीराव चोरगे यांना भूदरगड साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजी चोरगे यांना गारगोटी (कोल्हापूर) येथील अक्षरसागर साहित्य मंचाचा ‘भूदरगड साहित्यभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शाहू वाचनालयात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयंत कळके होते.

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अक्षरसागर साहित्य मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी केले. परीचय डॉ. अर्जुन कुंभार यांनी करून दिला. डॉ. तानाजीराव चोरगे यांना ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. के. ए. मोमीन यांच्या ‘काळीजगोष्टी’ या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. चोरगे यांनी आपला ४५ पुस्तकांच्या लेखनाचा प्रवास उलगडला. लुप्त होत चाललेली भारतीय संस्कृती, नैसर्गिक आपत्ती, लिव्ह इन रिलेशनशिप आदी सामाजिक समस्यांवर त्यांनी आपले विचार मांडले. प्रा. कृष्णात खोत यांनी प्रतीक आणि प्रतिमा यांच्या नादात न अडकता लेखकाने आपली प्रतिभा अबाधित ठेवून ग्रामीण लोकसंस्कृती जतन करत समाजभान ठेवून लेखन करावे. लेखक सत्तेबरोबर कधीच नसतो तर तो सत्याबरोबर असतो, असे सांगितले.

यावेळी प्रतिमा इंगोले (पुणे), दीपक तांबोळी (जळगाव), डॉ. राजेश गायकवाड (औंढ्या नागनाथ), वीरभद्र मिरेवाड (नांदेड), डॉ. गणपती कमळकर (कागल) यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, तर डॉ. मनःसाद (सोलापूर), भास्कर बंगाळे (पंढरपूर), सुभाष वाघमारे (सातारा), डॉ. सुनील विभूते (बार्शी), डॉ. प्रतिभा जाधव (नाशिक), डॉ. आनंद वारके (बिद्री), दीक्षा गुरव (गंगापूर), साताप्पा सुतार (पुष्पनगर), कुमार हेगडे (कारदगा), मायकेल डिसोजा (करडवाडी), डॉ. अशोक पाटील (पाचर्डे), भरत चौगले (थड्याची वाडी), अरविंद मानकर (सरवडे) आदींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय धावपटू बजरंग चव्हाण यांचा डॉ. चोरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बा. स. जठार, दीपक मेंगाणे, राहूल देसाई, मंचचे उपाध्यक्ष डी. व्ही. कुंभार, राजन कोनवडेकर, प्रा. शिवाजी चोरगे, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply