रत्नागिरी : येथील सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे ग्लोबल चेंबर फॉर सारस्वत आंत्ररप्रुनर्सच्या सहकार्याने एमएसएमई – क्षमता आणि आगामी संधी या विषयावर विशेष सेमिनार आयोजित केले आहे. येत्या शनिवारी (दि. २९ एप्रिल) संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्हमध्ये कार्यक्रम होईल.
यावेळी व्याख्यान देणारे मांगिरीष पै-रायकर मराठीमधून मार्गदर्शन करणार आहेत. ते गोव्यातील सावईवेरे येथील आरसीपीआर कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष, , ब्राऊन पॅकेजिंग सिस्टिम्स प्रा. लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. श्री. रायकर हे एमएसएमई नॅशनल कौन्सिलचे अध्यक्ष, असोचेमचे सदस्य, भारत सरकारच्या एमएसएमई राष्ट्रीय मंडळाचे सदस्य आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एमएसएमई सबलीकरण समितीचे सदस्य आहेत.
एमएसएमईसमोरील आव्हाने आणि त्यातून योग्य तर्हेने बदल घडवून मार्ग काढणे तसेच सुरवातीला व्यवसाय कसा सुरू करायचा, प्रारंभिक आव्हाने, अडचणीवर मात कशी करावी, व्यवसाय सुरू करण्यात असलेले महत्त्वाचे स्वरूप याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यशस्वी प्रकल्पाची महत्त्वाची पावले आणि नवउद्यमी यशोगाथा इत्यादी विषयांवर विचार मांडतील.
या सेमिनारमध्ये रत्नागिरीतील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

