रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस शाखा आज नव्या स्वतःच्या वास्तूत स्थलांतरित झाली.
मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पावस दशक्रोशीतील सुमारे पाचशे ग्राहकांनी आज शाखेला भेट देऊन पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि संचालक, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ॲड. दीपक पटवर्धन यांनी शाखेचे उद्धाटन केले.
याप्रसंगी श्री. पटवर्धन म्हणाले की, पावस दशक्रोशीत पतसंस्थेचे ९ हजार ग्राहक असून २१ कोटी ८८ लाखांची कर्जे दिली आहेत. ही कर्जवसुली १०० टक्के आहे. नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंद होत आहे. आपले आचरण, विचार चांगले असतील तर स्वामी स्वरूपानंदांसारख्या थोर विभूतींचा आशीर्वाद मिळतो. हा आशीर्वाद स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला लाभला आहे. स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे. पावसमध्ये शाखा सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन ८ दिवसांत शाखा सुरू करण्यात आली. तेव्हापासून ग्राहकांचे लाखमोलाचे सहकार्य लाभत आहे. आज या विश्वासाच्या बळावर २००० चौरस फुटाच्या मोक्याच्या जागेत स्थलांतर केले आहे. ग्राहकाला देव मानून उत्तम सेवा देत आहोत. ग्राहकांचा वेळ वाचला पाहिजे म्हणून तत्पर, अचूक, विश्वासार्ह सेवा दिली जाते. पतसंस्था जगतात ठेववृद्धी मास ही संकल्प १९९४ पासून पतसंस्थेने रुजवली. पावस पंचक्रोशीतील विकासचक्र अधिक गतिमान करण्याचा संकल्प आहे.
यावेळी प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांनी पावस दशक्रोशीत आंबा, फणस, काजू, नारळ, कोकम यांवर प्रक्रिया उद्योग सुरू होण्याकरिता पतसंस्थेने मदत करण्याचे आवाहन केले. प्रामाणिकपणा, तत्पर व उत्तम सेवा देणारे कर्मचारी यांच्यामुळे ग्राहक समाधानी आहेत. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ग्रामस्थांना मदत केली व संस्थेची अशीच भरभराट होवो, अशा शुभेच्छा रमण दळी यांनी दिल्या. लाईक फोंडू म्हणाले, ग्राहकांचे समाधान होईल, असे कर्मचाऱ्यांचे वागणे असून संस्थेचे कामकाज दुसऱ्या मजल्यावरसुद्धा सुरू होवो. विश्वास दामले यांनी पतसंस्था व ॲड. दीपक पटवर्धन यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
पतसंस्थेसाठी जागा उपलब्ध करून देणारे अक्रम नाखवा, इंटीरियर डिझायनर प्रशांत माचकर, गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकर, करिम सावकार, हनिफ मुल्ला, फकीर पांढरे, मजिद काझी, इम्रान हाजू, जुनेद फोंडू, नाना पावसकर, प्रशांत फडके, सुधाकर गुरव, संतोष सुर्वे, रणजित सुर्वे, अमोल पाथरे, पावसचे उपसरपंच प्रवीण ऊर्फ बाय शिंदे, विजय देसाई, विक्रांत रांगणकर, मनोहर लेले, कांचनकुमार काळे, रघुनाथसिंह चुंडावत, मंगेश भोजने, अरविंद पवार, प्रकाश पवार, समीर हातोडकर, बाबाशेठ साळवी यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन व्यवस्थापक मोहन बापट यांनी केले. यावेळी उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, पावस शाखा व्यवस्थापक विशाल सावंत व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे स्वागत केले.
याप्रसंगी उपाध्यक्ष माधव गोगटे, गोळपच्या सरपंच सौ. मिताली भाटकर, उद्योजक विजय देसाई, पतसंस्थेचे संचालक अजित रानडे, जयप्रकाश पाखरे, शरद्चंद्र लेले, प्रसाद जोशी, राजू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

