तरुणी आणि महिलांना रत्नागिरी पोलिसांचे आवाहन

तरुणीशी असभ्य वर्तन करणाऱ्या रत्नागिरीतील रिक्षाचालकाला अटक

रत्नागिरी : महाविद्यालयीन तरुणीशी असभ्य वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि महिलांना अशा घटना घडू नयेत, यासाठी आवाहन केले आहे. अविनाश म्हात्रे (वय सुमारे ३५) असे असभ्य वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

काल (दि. १३ जून) सायंकाळी साडेतीनच्या दरम्यान एक १८ वर्षीय तरुणी रत्नागिरीत जयस्तंभ येथे रिक्षामध्ये बसली. तिला कुवारबावकडे जायचे होते. ती एकटीच रिक्षामधून आपल्या घराकडे निघाली असताना त्या रिक्षाचालकाने या तरुणीसोबत असभ्य आणि अश्लील वर्तन केले. तरुणीने भीतीपोटी ही बाब कोणालाही सांगितली नव्हती. मात्र सोशल मीडियावर ती घटना पोस्ट केली. आज मुलीच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने थेट पोलीस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित रिक्षाचालकाला दीड तासात अटक केली. लैंगिक छळाचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. त्याची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली.

ही घटना लक्षात घेऊन रत्नागिरी शहरामधील सर्व तरुणी आणि महिलांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, दिवसा अगर रात्री-बेरात्री रिक्षा, बस, ट्रेन अथवा कोणत्याही प्रवासी वाहनाने एकट्याने प्रवास करत असाल, तर त्या वाहनाचा क्रमांक आपल्या मोबाइलद्वारे टिपून घ्यावा आणि आपल्या पालकांना, नातेवाईकांना कळवावा. प्रवासादरम्यान जर एखाद्या व्यक्तीच्या हालचाली संशयित किंवा विकृत दिसल्यास किंवा संशय आल्यास लागलीच ११२ क्रमांकावर अथवा १०९१ या हेल्पलाइनवर तसेच रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षाच्या (02352) 222222 या फोनवर संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता लागलीच ही कृती करावी. रत्नागिरी पोलीस दलाच्या सोशल मीडियावरही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी पोलीस दलाचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स असे आहेत –
https://twitter.com/ratnagiripolice?lang=en
https://www.facebook.com/ratnagiripolice
https://www.instagram.com/ratnagiri.police/?hl=en
https://www.kooapp.com/profile/RatnagiriPolice

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply