उज्ज्वला भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत सिद्धांत सावंत विजेता

रत्नागिरी : येथे आयोजित करण्यात आलेल्या उज्ज्वला वसंत भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद प्रथम मानांकित सिद्धांत सावंत याने पटकावले, तर सौरीश कशेळकर उपविजेता ठरला.

रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत ही पहिलीच दोन दिवसीय तालुकास्तरीय क्लासिकल स्पर्धा मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीने आयोजित केली होती.

स्पर्धेत सिद्धांत विरुद्ध सौरीश यांचा डाव बरोबरीत सुटला, तर शेवटच्या फेरीत सिद्धांतने सोहम रुमडेविरुद्ध अटीतटीच्या डावात विजय संपादन केला. सौरीशला यश गोगटे याने बरोबरीत रोखले. दोघेही स्पर्धेत अपराजित राहिले. सिद्धांत ५.५ गुणांसह पहिला, तर सौरीश ५ गुणांसह दुसरा आला. यश गोगटे, राज नारकर आणि देवाशीष पोरे यांनी ४.५ गुणांसह अनुक्रमे तिसरा ते पाचवा क्रमांक पटकावला. मंगेश मोडक यांनी ४ गुणांसह सहावा क्रमांक प्राप्त केला.

विविध गटांतील प्रथम क्रमांकाचे विजेते असे – १७ वर्षे वयोगटात राजरत्न व्हनकटे, १५ वर्षे वयोगटात हृषीकेश कुंभारे, १३ वर्षे वयोगटात आर्यन धुळप, ११ वर्षे वयोगटात आयुश रायकर, ९ वर्षे वयोगटात शर्वील शहाणे, ७ वर्षांआतील गटात अर्णव गावखडकर. महिलांमध्ये निधी मुळ्ये हिने, तर अनरेटेड खेळाडूंमध्ये मानस सिधये याने प्रथम स्थान प्राप्त केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंगेश मोडक, विवेक सोहनी, वरद पेठे यांचे सहकार्य लाभले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply