विरारच्या लायन्स क्लबतर्फे साखरपा परिसरात शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ विरार विकासतर्फे साखरपा (ता. संगमेश्वर) आणि परिसरातील शाळांमध्ये एक लाखाहून अधिक किमतीच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.

गरजू विद्यार्थ्यांना शाळेची बॅग, रेनकोट, ड्रॉइंग बुक, रंग, वह्या, पेन-पेन्सिल, रबर, शार्पनर, स्केल, पाऊच, परीक्षा पॅड इत्यादी भेटवस्तू देण्यात आल्या. क्लबचे अध्यक्ष भावेश धनेचा, जीएसटी चेअरपर्सन योगेश कपुरिया, प्रकल्प समन्वयक राजेंद्र कदम, क्लब सदस्य वृषाली इंदुलकर आणि श्रीहास चुरी यांनी साखरपा परिसरातील ११ शाळांमधील १६७ विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले. त्यासाठी हे सारे सदस्य विरारहून खास साखरप्याला आले होते. विविध देणगीदारांच्या सहकार्यातून प्रकल्पाचा सुमारे एक लाखाचा खर्च करण्यात आला.

या उपक्रमासाठी शिक्षक श्री. मोटे, श्री. सावंत, श्री. पाटील, श्री. जाधव, श्री. लाड, ग्रामपंचायती आणि शाळेच्या अधिकार्‍यांनी वितरणासाठी मदत केल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ विरार विकासचे कोषाध्यक्ष राजेंद्र कदम यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply