Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

एक जुलैपासून कल्पवृक्ष सप्ताहांतर्गत रत्नागिरीत मोफत मार्गदर्शन

coconut tree with coconuts

Photo by Francesco Ungaro on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : कृषी दिन अर्थात एक जुलैपासून स्वराज्य अ‍ॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे रत्नागिरीत कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.‌ त्यामध्ये नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम सात जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

स्वराज्य अ‍ॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २०१५पासून नारळ झाडांचे व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करत आहे. नारळ पाडपी न मिळणे, रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीची लागण, गेंड्या भुंग्यांचे आक्रमण अशा समस्यांमुळे नारळ बागायतदार त्रस्त आणि हतबल झाले आहेत. विविध समस्यांच्या व्यवस्थापनासाठी येणारा खर्च सुरुवातीला उत्पन्नापेक्षा जास्त होतो. म्हणून कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडाकडे अनेक जण लक्षच देत नाहीत.

नारळ झाडाच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये, यासाठी आणि नारळ झाडांच्या योग्य नियोजनासाठी स्वराज्य अ‍ॅग्रो कंपनीने कल्पवृक्ष सप्ताहाच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

या सप्ताहात दररोज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत रत्नागिरीत मार्गदर्शन केले जाणार आहे. जास्तीत जास्त नारळ झाड मालकांनी या कल्पवृक्ष सप्ताहात सहभागी व्हावे आणि शिबिराला येताना मोबाइलमध्ये नारळाच्या झाडांचे झावळीजवळचे आणि बुंध्याजवळचे फोटो काढून आणावेत, असे आवाहन कंपनीने केले आहे.

मार्गदर्शन शिबिराचा पत्ता : २०३, श्रम साफल्य, मनीषा टायपिंग सेंटरच्या वर, दुसरा मजला, खालची आळी, रत्नागिरी

अधिक माहितीसाठी संपर्क : 9607192912, 8080188218

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version