Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कदम फाउंडेशनतर्फे खवटी, नातूनगर केंद्रात शैक्षणिक साहित्य वाटप

Advertisements

खेड : आपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशन तर्फे खवटी आणि नातूनगर केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नातूनगर क्र. १ केंद्रशाळेत हा कार्यक्रम झाला.

प्रारंभी खवटी प्रभागाचे विस्तार अधिकारी संतोष भोसले यांनी कदम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कदम फाउंडेशनच्या विविध समाजोपयोगी कार्याची माहिती सांगून फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी कदम फाउंडेशनच्या सदस्या सौ. सायली कदम आणि नीरज कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

कदम फाउंडेशनतर्फे २०१७ पासून दरवर्षी शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कामगिरी करण्यात येत आहे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, महिला संरक्षण प्रशिक्षण, कोविड योद्ध्यांचा सन्मान, शैक्षणिक साहित्य वाटप, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन इत्यादी विविध उपक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष गणपत कदम, उपाध्यक्षा सौ. संगीता कदम, सचिव प्रकाश कदम, खजिनदारपंकज कदम, सदस्य नारायण कदम, सौ. सुगंधा कदम, सौ. सरस्वती कदम, प्रवीण कदम, अजित कदम, खवटी आणि नातूनगर केंद्रातील शाळांचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कशेडी गावणकर शाळेचे पदवीधर शिक्षक प्रभाकर कोळेकर यांनी केले, तर खवटी व नातूनगर केंद्रप्रमुख श्री. उंडे गुरुजी यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version