खेड : अपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशनने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेचे विषय असे – गट अ (वयोगट १८ वर्षे) – भजन आणि देशभक्तीपर गीत. गट ब (१८ वर्षांवरील) – स्फूर्तिगीत आणि लोकगीत.
स्पर्धा फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. ज्या महिलांना भाग घ्यायचा आहे, त्यांनी आपल्या गटानुसार विषय निवडावे. गीत मराठी माध्यमात असावे. गायनाचा व्हिडीओ किमान ३ मिनिटांचा असावा. फक्त समूह गायनच ग्राह्य धरले जाईल. प्रत्येक समूहात किमान ५ स्पर्धक असावे. प्रत्येक गटाला प्रमाणपत्र मिळेल. दोन्ही गटांमधील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २००० आणि १००० रुपयांची बक्षिसे दिली जातील.
नोंदणीची अंतिम तारीख १३ मार्च २०२२, तर व्हिडीओ सादर करण्याची अंतिम तारीख १९ मार्च २०२२ आहे. नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/BpYsSvotM66YzW616 या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ सादर करण्यासाठी आवश्यक असलेली लिंक नोंदणीनंतर मोबाइल नंबरद्वारे किंवा ईमेल आयडीद्वारे पाठविली जाईल. अधिक माहितीसाठी 9172121157 फक्त व्हॉट्स अॅपवर संपर्क साधावा.
स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड