रत्नागिरीत आज एकही नवा रुग्ण नाही; एकही करोनामुक्त नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ मार्च) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही आणि एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या जिल्ह्यात केवळ ७ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४५६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९१५ म्हणजे ९६.९९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेले सर्व १३४ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व ३१६ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ३० हजार ४४४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ३, तर लक्षणे असलेले ४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ३, तर संस्थात्मक विलगीकरणात ४ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली नाही.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. डीसीएचमध्ये ४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तसेच अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण नाही.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात १० मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५९ सत्रं पार पडली. त्यात १६१ नागरिकांनी लशीचा पहिला, तर २१५६ जणांनी दुसरा डोस घेतला. २०४ जणांनी तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेतला. एकूण २५२१ जणांचे लसीकरण १० मार्च रोजी झाले. १० मार्चपर्यंतच्या १८ वर्षांवरील व्यक्तींच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५३ हजार १०० जणांचा पहिला, तर ८ लाख ७० हजार ११६ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख २३ हजार ८६५ जणांचे लसीकरण झाले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply