धाडिला राम तिने का वनी? – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (११ मार्च २०२२) – धाडिला राम तिने का वनी?
सादरकर्ती संस्था – मुंबई मराठी साहित्य संघाची अमृत नाट्य भारती शाखा, मुंबई

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी भाग घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज ११ मार्च २०२२ रोजी धाडिला राम तिने का वनी? हे नाटक मुंबईतील मुंबई मराठी साहित्य संघाची अमृत नाट्य भारती शाखा सादर केले.

‘धाडिला राम तिने का वनी’ हे संगीत नाटक म्हणजे भासाच्या ‘प्रतिमा’ संस्कृत नाटकाचा चित्रकार दत्तात्रय ग. गोडसे यांनी केलेला स्वैर अनुवाद. त्यातील गाणी राजा बढे यांनी लिहिली आहेत आणि संगीत जितेंद्र अभिषेकी याचे आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील कैकेयीचे पात्र भासाने अगदी वेगळ्या तऱ्हेने रंगविले आहे. त्यामुळेच एरवी जिच्या वाट्याला रोष येतो, ती कैकेयी या नाटकात प्रेक्षकांची सहानुभूती मिळवते. आणखी एक गोष्ट म्हणजे या नाटकाचा नायक राम नव्हे, तर भरत आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्य शाखेनेच सर्वप्रथम हे नाटक ६ जून १९७६ रोजी रंगमंचावर आणले होते. रत्नागिरीच्या राज्य नाट्य स्पर्धेत तीच संस्था नाटक सादर करत आहे.

लेखक – द. ग. गोडसे, संगीत पं. जितेंद्र अभिषेकी, गीते – राजाभाऊ बडे, दिग्दर्शन आणि संगीत मार्गदर्शन – अरविंद पिळगावकर, प्रकाश – विपुल खेडेकर, ध्वनिसंकेत – सुमेध उन्हाळेकर, रंगभूषा – राजन वर्दम, वेशभूषा – राकेश घोलप, नीलम चव्हाण, रंगमंच व्यवस्था – प्रमोद निवळे, सूरज निवळे, संतोष भुवड, निर्मिती व्यवस्था – प्रमोद पवार आणि सुधीर ठाकूर, संगीत साथ – ऑर्गन – प्रकाश वगळ, नीलेश भिवणकर, तबला – सुहास चितळे.

भूमिका आणि कलावंत :
राम : तनय पिंगळे
भरत : रोहन देशमुख
लक्ष्मण : अनिरुद्ध पेंडसे
राजा दशरथ : नितीन मतकरी
सुमंत : आनंद पालव
रावण : मोहित वैद्य
कंचुकी : ऋषिकेश भोसले
देवकुलिक : महेश बोडस
सारथी, चेट : सचिन नवरे
विजया : पूर्वा देवधर
सारसिका : नक्षत्रा बोडस
कौसल्या : ऋता पिंगळे
कैकयी : तन्वी गोरे
सीता : सिद्धी बोंद्रे

नाटकातील विविध प्रसंगांची धावती झलक

नाटकाचा काही अंश आणि गीते

स्पर्धेचे वेळापत्रक

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply