पर्यावरण दिनानिमित्ताने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा

खेड : अपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशनतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा तीन गटांमध्ये होणार आह. पहिला गट वय वर्षे ७ पर्यंत असेल. या गटासाठी झाडे, फुले, फळे किंवा निसर्ग चित्र हा विषय आहे. दुसरा गट आठ ते अकरा वर्षे वयोगटासाठी असून या गटासाठी अशी असावी बाग किंवा माझा आवडता ऋतू हे विषय आहेत. तिसरा गट १२ ते १५ वयोगटासाठी असून या गटाकरिता निसर्ग आपला मित्र किंवा माझ्या स्वप्नातील गाव हे विषय आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, त्यांनी आपल्या गटानुसार विषय निवडून चित्र काढावयाचे आहे. चित्र कोणत्याही माध्यमात रंगवले तरी चालेल. कोणत्याही कोऱ्या कागदावर चित्र काढावे. चित्र स्वतः काढलेले असावे. प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढले जातील. चित्राचे छायाचित्र येत्या १८ जूनपर्यंत गुगल फॉर्मवरून किंवा व्हॉट्स अॅपवर पाठवावे. सोबत आपली पूर्ण माहिती द्यावी. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र मिळेल. प्रत्येक गटात अनुक्रमे एक हजार रुपये, ७०० रुपये आणि ५०० रुपये अशी तीन बक्षिसे दिली जातील.

स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9623493049 या क्रमांकावर व्हाॅट्सअॅपद्वारे संपर्क साधावा. स्पर्धेसाठी https://forms.gle/RjwQWdYEhPNkdDbD6 या गुगल फॉर्म लिंकवर क्लिक करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply