खेड : अपेडे (ता. खेड) येथील कदम फाउंडेशनने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ३६५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विनय माळी, रमेश गाढवे, मृदुल मानकामे यांनी परीक्षण केले. तीन गटांत झालेल्या या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना अनुक्रमे १ हजार रुपये, ७०० रुपये आणि ५०० रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ऑनलाइन झाले.
स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा – गट अ – यती बाळाराम खेडेकर (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड), आर्या रूपेश शिंदे (गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी), आर्वी प्रशांत लोंढे (माय छोटा स्कूल, रत्नागिरी).
गट ब – त्रिवेणी चंद्रकांत गमरे (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड, रत्नागिरी), सारा योगेश वनकर (जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४, संगमेश्वर), अनन्या नीलेश दोंदे (रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड).
गट क – विघ्नेश विवेक आचार्य (गोविंदराव निकम कॉलेज, सावर्डे, ता. चिपळूण), श्रावणी चंद्रशेखर पवार
(जी.जी.पी. इंग्लिश मीडियम स्कूल, मिरजोळे, रत्नागिरी), ऋषभ हर्षद कोतवडेकर (आर. बी. शिर्के प्रशाला, रत्नागिरी).

