सिंधुदुर्गात नवबाधितांच्या संख्येत घट, करोनामुक्तांच्या संख्येत वाढ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट, तर करोनामुक्तांच्या संख्येत वाढ दिसू लागली आहे. जिल्ह्यासाठी हे आश्वासक चित्र आहे.

आज, ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४४७ आणि एकूण ३७ हजार ६१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज जिल्ह्याबाहेर तपासणी केलेल्या चौघांसह नवे १७८ करोनाबाधित रुग्ण आढळले. एकूण बाधितांची संख्या आता ४३ हजार ४२९ झाली आहे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ४ हजार ७२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २१, दोडामार्ग – ६, कणकवली – २९, कुडाळ – ४०, मालवण – ४५, सावंतवाडी – २४, वैभववाडी – २, वेंगुर्ले – १०, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६७१, दोडामार्ग १५८, कणकवली ७२३, कुडाळ ९७३, मालवण १००९, सावंतवाडी ४९७, वैभववाडी २०१, वेंगुर्ले ४७३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी २१६ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०८६ झाली आहे. आज नोंद झालेल्या आठ आणि आधी मरण पावलेल्या आणि आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, दोडामार्ग १, कणकवली २, मालवण ५, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १४३, दोडामार्ग – ३२, कणकवली – २१८, कुडाळ – १६४, मालवण – २२३, सावंतवाडी – १५१, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ८१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ७.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply