रत्नागिरी जिल्ह्यात सातशे रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (६ जुलै) ३८६ नवे करोनाबाधित आढळले, तर ७०० रुग्ण करोनामुक्त झाले. सलग तिसऱ्या करोनामुक्तांची संख्या ४०० हून अधिक आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – १८७, अँटिजेन चाचणी – १८३ (एकूण ३७०). आधी नोंद न झालेल्या १६ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ३८६ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६४ हजार ५९५ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.७६ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १३.७८ टक्के आहे.

आज चार हजार ९८५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात दोन हजार ९६ गृह विलगीकरणात, दोन हजार ८८९ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ६०४ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज चार हजार ५४३ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ११ हजार ३३९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ७०० रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५७ हजार १८१ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८८.८२ टक्के आहे.

जिल्ह्यात कालच्या ५ आणि आजच्या ३ अशा एकूण ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८२५ झाली आहे. मृत्युदर २.८३ टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५९७, खेड १७०, गुहागर १३८, दापोली १५५, चिपळूण ३५६, संगमेश्वर १६९, लांजा ९४, राजापूर १०७, मंडणगड २५. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८२५).
………….

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply