रत्नागिरी : शिवाजीनगर येथील श्रीमती विमलाताई पटवर्धन शहर वाचनालयातर्फे वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंद न. पानवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि परिसरातील कवींसाठी योग्य मतदान लोकशाहीचा प्राण, प्रदूषणमक्त जगासाठी, मी, माझे कुटुंब आणि जग तसेच सुंदर माझी वसुंधरा या चार विषयांवर कविता लिहायच्या आहेत. विषयप्रधान जनजागृती आणि कृतिप्राधान्यता या दृष्टिकोनातून कवींनी आपल्या दोन कविता येत्या ३० जुलैपर्यंत वाचनालयात आणून द्याव्यात. सोबत आपला पूर्ण पत्ता, मोबाइल नंबरही द्यावा. वाचनालयाची कार्यालयीन वेळ सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी साडेतीन ते सात ही आहे.
स्पर्धेत तीन विजेते क्रमांक काढण्यात येणार असून सर्व सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. बक्षीसपात्र कवींसह काव्यवाचन सादर करण्याची संधीही देण्यात येईल. हा कार्यक्रम येत्या ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे.
या स्पर्धेत अधिकाधिक कवींनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. मोहिनी पटवर्धन, सचिव अॅड. मिलिंद पिलणकर आणि स्पर्धा संयोजक सौ. शिल्पा पानवलकर यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

