स्वरूपानंद पतसंस्थेच्या नव्या योजनेत साडेतीन कोटीच्या ठेवी

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने जाहीर केलेल्या दसरा दिवाळी ठेव योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १५ ऑक्टोपरपासून सुरू झालेल्या या ठेव योजनेत पहिल्या बारा दिवसांत ३ कोटी ४७ लाखांच्या नव्या ठेवी संकलित झाल्या आहेत.

आजपर्यंत २५९ ठेवीदारांनी या ठेवी ठेवल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. संस्थेच्या एकूण ठेवी २९२ कोटीच्या झाल्या असून दसरा दिवाळी ठेव योजनेत त्या ठेवी ३०० कोटींच्या घरात नेण्याचा प्रयत्न आहे. विश्वासार्ह पारदर्शक व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार पतसंस्थेचा पर्याय निवडतात, याची प्रचीती सातत्याने घेताना वेगळे समाधान प्राप्त होते. असे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.

ठेव वृद्धीमासात स्वरूपांजली ठेव योजनेत १२ ते १८ महिने कालावधीसाठी सर्वसाधारण ठेवीदारांसाठी व्याजाचा दर ८ टक्के, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ८.२५ टक्के व्याजदर आहे. सोहम ठेव योजनेत १९ ते ३६ महिने कालावधीसाठी ८.२५ टक्के सर्वसाधारण तर ८.५० टक्के दर ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी असले. पाच लाख किंवा त्याहून अधिक ठेवींसाठी व्याजदर ८.६० टक्के असेल.

सर्वदूर ठेवीदारांबरोबर संपर्क करण्यासाठी अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी पत्रे पाठवली असून ठेव वृद्धीमासात वाढता प्रतिसाद मिळत आहे. सर्वच शाखा कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेव संकलित होत असून जुने आणि नवीन ग्राहक या ठेव योजनेचा लाभ घेत आहेत. सणासुदीच्या या कालखंडात आपली बहुमोल ठेव स्वरूपानंदमध्ये गुंतवून ठेवीदारांनी ठेव योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply