नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी येत्या दि. १ नोव्हेंबरपासून एलटीटी-थिवी ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी (गाडी क्र. 01129) १ नोव्हेंबरपासून बुधवार, शनिवार तसेच सोमवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. मुंबईतून सुटलेली ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता गोव्यात थिवीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. 01130) थिवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर २ नोव्हेंबरपासून गुरुवार, शनिवार तसेच मंगळवारी धावणार आहे. ही गाडी थिवी स्थानकावरून दुपारी तीन वाजता सुटून दुसऱ्या दिवशीच्या पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.
या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी हे थांबे असतील.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

